नागपूरचे शरद बोबडे नवे सरन्यायाधीश; १८ नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार

न्यायमूर्ती शरद बोबडे हे लवकरच सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर आता न्यायमूर्ती बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.

न्यायमूर्ती शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदी विराजमान होणार असून ते १८ नोव्हेंबर रोजी पदाची सूत्र आपल्या हाती घेणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायमूर्ती शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस विधी आणि न्याय मंत्रालयाला पत्र लिहून केली होती. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून थपथ घेतली होती. ते १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे परंपरेनुसार आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ असलेल्या न्यायाधीश बोबडे यांची शिफारस त्यांनी सरन्यायाधीश पदासाठी केली होती. बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून ते देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter