परभणी येथे जानेवारी महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक ४ ते १३ जानेवारी २०२० दरम्यान परभणी येथे औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या वतीने खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी औरंगाबाद, बुलडाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सोल्जर जनरल ड्यूटी (जीडी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ४५ टक्के गुणांसह इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ आक्टोबर १९९८ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण (PCM) असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ आक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर ट्रेड्समन पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता आठवी किंवा दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ आक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ४८ किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

मेळाव्याची तारीख – दिनांक ४ जानेवारी २०२० ते १४ जानेवारी २०२० आहे.

मेळाव्याचे ठिकाण – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (महाराष्ट्र)

प्रवेशपत्र – दिनांक २० डिसेंबर २०१९ पासून उपलब्ध होतील.

नोंदणी – दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ ते १९ डिसेंबर २०१९ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन नोंदणी करा

App डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.