पंजाब आणि सिंध बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६८ जागा

पंजाब आणि सिंध बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 168 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण १६८ जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक (कायदा) पदाची १ जागा, सचिव पदाची १ जागा, राजभाषा अधिकारी पदाची १ जागा, व्यवस्थापक (कायदा) पदाच्या १० जागा, अग्निशमन अधिकारी पदाच्या १ जागा, सुरक्षा अधिकारी पदाच्या १५ जागा, कृषी क्षेत्र अधिकारी पदाच्या ५० जागा, चार्टर्ड अकाउंटंट्स पदाच्या ५० जागा, सॉफ्टवेअर डेव्हलपर/ आयटी प्रोग्रामर पदाच्या ३० जागा, अधिकारी (भाषा) पदाच्या ५ जागा, तांत्रिक अधिकारी (नागरी) पदाच्या २ जागा आणि तांत्रिक अधिकारी (विद्युत) पदाच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार विधी पदवीसह १० वर्ष अनुभव धारक, पदवीसह इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया सदस्य आणि ६/ ८ वर्ष अनुभव धारक, इंग्रजी विषयासह संस्कृत/ हिंदी पदव्युत्तर पदवी आणि १०/ १२ वर्ष अनुभव धारक, विधी पदवीसह 2/ ४ वर्ष अनुभव धारक, बी.ई./ बी.टेक.(फायर/ फायर टेक्नोलॉजी & सेफ्टी) आणि ५ वर्ष अनुभव धारक, कोणत्याही शाखेतील पदवीसह नौदल/ सैन्य/ हवाई दलात कमिशनर ऑफिसर म्हणून किमान ५ वर्ष अनुभव धारक, कृषी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ मत्स्य विज्ञान पदवी (६०% गुणांसह) किंवा समतुल्य पदवीसह किमान ६ महिने अनुभव धारक, सी.ए., बी.ई./ बी.टेक.(कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर अँप्लिकेशन/ आयटी) किंवा ६०% गुणांसह कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर अँप्लिकेशन/ आयटी पदव्युत्तर पदवीसह किमान १ वर्ष अनुभव धारक, इंग्रजी विषयासह संस्कृत/ हिंदी पदव्युत्तर पदवीसह १ वर्ष अनुभव धारक, सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (६०% गुणांसह) उत्तीर्ण, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (६०% गुणांसह) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ जुलै २०१९ रोजी ३५ ते ४५ वर्ष किंवा ३० ते ४० वर्ष
किंवा २५ ते ३५ वर्ष किंवा २० ते ३० वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रव्रगतील उमेदवारांसाठी ८२६/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७७/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});