नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात विविध पदांच्या एकूण १३ जागा

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
बालवाडी शिक्षिका व बालवाडी मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – बालवाडी शिक्षिका पदाकरिता उमेदवार बालवाडी मान्टेसरी व तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा तसेच किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा व बालवाडी मदतनीस पदाकरिता उमेदवार किमान इय्यता सातवी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – बालवाडी शिक्षिका पदाकरिता उमेदवाराला प्रतिमाह १५,०००/- रुपये व बालवाडी मदतनीस पदाकरिता उमेदवाराला १२,०००/- रुपये मानधन मिळेल.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ वर्षे ते ३० वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याचा पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भूखंड क्र. १, किल्ले गावठाण जवळ, पामबीच जंक्शन सेक्टर, १५-ए, सी. बी. डी. बेलापूर शिक्षण विभाग

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत अर्ज करता येतील.

 

कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.