वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३१  जुलै २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस., एम.डी., डी.एम., बी.एच.एम.एस., बी.एस्सी. (गृह विज्ञान), बी.एस्सी. (नर्सिंग), बी.फार्मसी., डी.फार्मसी अर्हता धारक असावा.

नोकरीचे ठिकाण – वर्धा जिल्हा

अर्ज करण्याचा पत्ता -जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा पिन कोड – ४४२००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०१९ (सायंकाळी ५ .३० वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 


 

Comments are closed.