केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ (मुदतवाढ)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्या मार्फत डिसेंबर २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ (सीटीईटी) मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इयत्ता पहिली ते पाचवी करिता 50% गुणांसह बारावी उत्तीर्णसह डी.एड./ डी.टी.एड. किंवा समतुल्य अर्हता आणि इयत्ता सहावी ते आठवी करिता 50% गुणांसह पदवीसह बी.एड. किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असावी.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी पेपर-पहिला किंवा पेपर-दुसरा करिता ७००/- रुपये व पेपर-पहिला आणि पेपर-दुसरा करिता १२००/- रुपये आहे, तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी पेपर-पहिला किंवा पेपर-दुसरा करिता ३५०/- रुपये व पेपर-पहिला आणि पेपर-दुसरा करिता ६००/- रुपये आहे.
परीक्षा – दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया घोषणापत्र डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!
Comments are closed.