केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भूवैज्ञानिक/ भूविज्ञानी पदांच्या एकूण १०२ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारच्या आस्थापनेवरील भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी पदांच्या एकूण १०२ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी परीक्षा- २०२० या परीक्षेत सहभागी होण्यसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

भूवैज्ञानिक/ भूविज्ञानी पदांच्या १०२ जागा
भूवैज्ञानिक (गट-ए) पदाच्या ७९ जागा, भूभौतिकीशास्त्रज्ञ (गट-ए)  पदाच्या ५ जागा, केमिस्ट (गट-ए) पदांच्या १५ जागा, आणि कनिष्ठ जलविज्ञानी (वैज्ञानिक-बी) गट-ए पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार पात्रतासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी २१ ते ३२ वर्ष किंवा २१ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेद्वारांसाठी २००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी पूर्व परीक्षा तसेच २७ व २८ जून २०२० रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});