तामिळनाडू निर्मिती व वितरण मंडळात विविध पदांच्या एकूण ५०० जागा
तामिळनाडू निर्मिती व वितरण महामंडळ यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सहाय्यक/ लेखापाल पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ सहाय्यक/ लेखापाल पदांच्या ५०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील (बी.कॉम) पदवी धारक असावा.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी किमान वय १८ वर्ष ते ३० वर्ष दरम्यान असावे. (आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेची अट नाही.)
फीस – खुल्या, बीसीओ, बीसीएम आणि एमबीसी/ डीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ एससीए/ दिव्यांग व निराधार प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.