पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक अभियंता पदांच्या ११० जागा

भारत सरकारचा उपक्रम (मणिरत्न कंपनी) असलेल्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ११० जागा
सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल) पदांच्या ८२ जागा, सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स) पदांच्या १० जागा आणि सहाय्यक अभियंता (सिव्हिल) पदांच्या १८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह संबंधित विषयात बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. (अभियांत्रिकी) आणि GATE-२०१९ परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रव्रगतील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.