भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागात शिकाऊ पदांच्या ४३२ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी ‘शिकाऊ’ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी ‘शिकाऊ’ पदांच्या ४३२ जागा
कोपा (सीओपीए) पदाच्या ९० जागा, वेल्डर पदाच्या २० जागा, स्टेनोग्राफर (इंग्रजी) पदाच्या २० जागा, स्टेनोग्राफर (हिंदी) पदाच्या ८० जागा, इलेक्ट्रीशियन पदाच्या ५० जागा, वायरमन पदाच्या ५० जागा, इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिक पदाच्या ६ जागा, आर.ए.सी. मॅकेनिक पदाच्या ६ जागा, वेल्डर फिटर पदाच्या ४० जागा, प्लंबर पदाच्या १० जागा, मेसन पदाच्या १० जागा, पेंटर पदाच्या १० जागा, सुतार पदाच्या १० जागा, यांत्रिक पदाच्या १० जागा, टर्नर पदाच्या १० जागा आणि शीट मेटल वर्कर्स पदाच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागास्वर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – बिलासपुर विभाग

फीस – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०१९ रोजी (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या NMK.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या

Comments are closed.