देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवर लिपिक संवर्गातील पदांच्या १२०७५ जागा

आयबीपीएस मार्फत देशातील अलाहाबाद बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूको बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया इत्यादी राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील पदांच्या एकूण १२०७५ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षा-२०१९ (नववी) मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक संवर्गातील पदांच्या एकूण १२०७५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी धारक किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०१९ रोजी २० ते २८ वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

परीक्षा – दिनांक ७, ८, १४ व २१ डिसेंबर २०१९ रोजी पूर्व परीक्षा आणि दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येतील.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १८ सप्टेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.