बीड येथे ४ ते १३ फेब्रुवारी २०२ दरम्यान खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक ४ फेब्रुवारी २०१९ ते १३ फेब्रुवारी २०२० दरम्यान बीड येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सोल्जर (जीडी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ४५ टक्के गुणांसह इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ अक्टोबर १९९८ ते 1 एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर (टेक्निकल) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सरासरी ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ अक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/ ८१ सेंमी असावी.

परभणी येथे जानेवारी महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

सोल्जर (ट्रेड्समन) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ अक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ४८ किलोग्रॅम आणि छाती ७६/ ८१ सेंमी असावी.

मेळाव्याची तारीख – दिनांक ४ ते १३ फेब्रुवारी २०२० आहे.

मेळाव्याचे ठिकाण – सैनिक विद्यालय, नगर रोड, बीड.

प्रवेशपत्र – दिनांक १५ जानेवारी २०२० पासून उपलब्ध होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन नोंदणी करा

App डाऊनलोड करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.