मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रात सुरक्षा अधिकारी/ रक्षक पदांच्या ९२ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ९२ जागा
सहाय्यक सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ९२ जागा

शैक्षणिक पात्रता – सहाय्यक सुरक्षा अधिकारी (ग्रेड-ए) पदांकरिता उमेदवार पदवीधर असावा तर सुरक्षा रक्षक पदाकरिता उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षादरम्यान असावे. (ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल वय ३० वर्ष व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल वय ३२ वर्षापेक्षा जास्त नसावे.)

परीक्षा फीस – सहाय्यक सुरक्षा अधिकारी (ए) पदाकरिता १५०/-  रुपये आणि सुरक्षा रक्षक पदाकरिता १००/- रुपये परीक्षा फीस आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.