मुंबई जिल्हा क्षयरोग संस्थेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या ४० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४० जागा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्र, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहायक, क्षयरोग आरोग्य प्रचारक, लेखापाल, पी. पी. एम. समन्वयक, भंडार सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि समुपदेशक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३८ वर्ष तर निवृत्त शासकीय अधिकारी/ विशेषतज्ञांसाठी ७५ वर्ष व कर्मचाऱ्यांसाठी ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे. (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि एच.एम. कर्मचाऱ्यांकरिता कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १५०/- रुपये तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी, बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी मुंबई (पूर्व), पिनकोड- ४०००१२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});