ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात विविध पदांच्या एकूण १२० जागा

ठाणे महानगरपालिका अंतर्गत पाणीपुरवठा विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२० जागा
कनिष्ठ अभियंता, स्थळपर्यवेक्षक आणि कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – कनिष्ठ अभियंता पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत शाखेची अभियांत्रिकी पदवीधारक तसेच स्थळपर्यवेक्षक पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत शाखेची अभियांत्रिकी पदविकाधारक आणि कामगार पदाकरिता किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – नागरी संशोधन केंद्र, ए-१ माजिवडा गाव रोड, तिरुमला सोसायटी, साईनाथनगर, माजिवडा, ठाणे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.