फास्टॅगचा फास आवळण्यास सुरुवात; टोलनाक्यांवरील सवलती होणार बंद
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅगचा वापर वाढविण्यासाठी फास आवळण्यास सुरूवात केली आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांना यापुढे टोलनाक्यांवर मिळणारी रिटर्न टोलमधील सवलत, मासिक पास, स्थानिक नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे सवलती हव्या असतील तर वाहनाला फास्टॅग लावावाच लागणार आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी या महामार्गांवर एक किंवा दोन लेन ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, आता दि. १५ जानेवारीपासून महामार्गांवर फास्टॅगची सक्ती करण्यास सुरूवात झाली आहे. तसेच ‘एनएचएआय’कडून फास्टॅगचा वापर वाढविण्यासाठी सवलतीही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments are closed.