रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा विभागात विविध पदांच्या ४६ जागा

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ व्यवस्थापक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या  एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १0 ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ४६ जागा
कनिष्ठ व्यवस्थापक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कनिष्ठ व्यवस्थापक पदाकरिता सीए/ सीएमएस व कनिष्ठ सहाय्यक पदाकरिता बी.कॉम/ बीबीए/ बीएमएस अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे.

परीक्षा फीस – कनिष्ठ व्यवस्थापक पदाकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी  ६००/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये तसेच कनिष्ठ सहाय्यक पदाकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

वेतनश्रेणी – कनिष्ठ व्यवस्थापक पदाकरिता ४०,००० ते १,४०,०००/- रुपये व कनिष्ठ सहाय्यक पदाकरिता १८,००० ते ६६,०००/- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १० ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा         ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});