तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३६१४ जागा
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३६१४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ३६१४ जागा
लेखा कार्यकारी, कार्यालयीन सहाय्यक, सचिवीय सहाय्यक, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल (ICTSM), प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट), मशिनिस्ट, मेकॅनिक (मोटार वाहन), मेकॅनिक डिझेल, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (हृदयविज्ञान आणि शरीरक्रियाविज्ञान), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी), रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, सर्वेक्षक, वेल्डर, सिव्हिल, संगणक शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि यांत्रिक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार पुढील प्रमाणे विविध शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या असणे आवश्यक आहेत.
लेखा कार्यकारी – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य (B.Com) मध्ये पदवीधारक असावा.
कार्यालयीन सहाय्यक – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए मध्ये बॅचलर डिग्री (पदवी) किंवा BBA धारक असावा.
सचिवीय सहाय्यक – उमेदवाराने आयटीआय (लघुलेखन/ इंग्रजी) पूर्ण केलेला असावा.
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – उमेदवाराने आयटीआय (संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट) पूर्ण केलेला असावा.
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – उमेदवाराने आयटीआय (ड्राफ्ट्समन/ सिव्हिल) पूर्ण केलेला असावा.
इलेक्ट्रिशियन – उमेदवाराने आयटीआय (इलेक्ट्रिशियन) पूर्ण केलेला असावा.
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – उमेदवाराने आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) पूर्ण केलेला असावा.
फिटर – उमेदवाराने आयटीआय (जोडारी) पूर्ण केलेला असावा.
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – उमेदवाराने आयटीआय (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) पूर्ण केलेला असावा.
माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली(ICTSM) – उमेदवाराने आयटीआय (माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल) पूर्ण केलेला असावा.
प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान (PCM किंवा PCB सह) मधून पदवीधारक किंवा आय.टी.आय. (लॅब सहाय्यक/ केमिकल प्लांट) पूर्ण केलेला असावा.
मशिनिस्ट – उमेदवाराने आयटीआय (मशिनिस्ट) पूर्ण केलेला असावा.
मेकॅनिक (मोटार वाहन) – उमेदवाराने आयटीआय (मेकॅनिक- मोटार वाहन) पूर्ण केलेला असावा.
डिझेल मेकॅनिक – उमेदवाराने आयटीआय (डिझेल मेकॅनिक) पूर्ण केलेला असावा.
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (हृदयविज्ञान/ शरीरक्रिया) – उमेदवाराने आयटीआय (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ हृदयविज्ञान आणि शरीरक्रिया विज्ञान) पूर्ण केलेला असावा.
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) – उमेदवाराने आयटीआय (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ पॅथॉलॉजी) पूर्ण केलेला असावा.
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) – उमेदवाराने आयटीआय (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रेडिओलॉजी) पूर्ण केलेला असावा.
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक – उमेदवाराने आयटीआय (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक) पूर्ण केलेला असावा.
सर्वेक्षक – उमेदवाराने आयटीआय (सर्वेअर) पूर्ण केलेला असावा.
वेल्डर – उमेदवाराने आयटीआय (वेल्डर- गॅस/ इलेकट्रीक) पूर्ण केलेला असावा.
सिव्हिल – उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातुन संबंधित शाखांमधून अभियांत्रिकी पदविका/ डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
संगणकशास्त्र – उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातुन संबंधित शाखांमधून अभियांत्रिकी पदविका/ डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार – उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातुन संबंधित शाखांमधून अभियांत्रिकी पदविका/ डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
इलेक्ट्रिकल – उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातुन संबंधित शाखांमधून अभियांत्रिकी पदविका/ डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
इलेक्ट्रॉनिक्स – उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातुन संबंधित शाखांमधून अभियांत्रिकी पदविका/ डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
इन्स्ट्रुमेंटेशन आणि यांत्रिक – उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातुन संबंधित शाखांमधून अभियांत्रिकी पदविका/ डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.