स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (१०+२) परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी मार्च २०२० मध्ये घेण्यात संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा-२०१९  (१०+२) या परीक्षेत सहभागी होण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (CHSL) परीक्षा-२०१९
कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून किमान इय्यता बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – दिनांक १ जानेवारी २०२० रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – पूर्व परीक्षा १६ ते २७ मार्च २०२० दरम्यान आणि मुख्य परीक्षा २८ जून २०२० ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Visitor Hit Counter