बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर साहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३७ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत महानगरपलिका वैद्यकीय कर्मचारी निवड मंडळ यांच्या आस्थापनेवरील साहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

साहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३७ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला १५,६००/- रुपये, ३९,१००/- रुपये अधिक ६,०००/- रुपये श्रेणी वेतन व नेहमीचे भत्तेसह मानधन मिळेल.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३५ वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.

परीक्षा फीस – अनारक्षित गटातील उमेदवारांकरिता ३१५/- रुपये आणि आरक्षित गटातील उमेदवारांकरिता २१०/- रुपये  आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – टो. रा. वैद्यकीय अधिकारी महाविद्यालय व बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, तळमजला, आवक-जावक विभाग, मुंबई सेंट्रल, मुंबई, पिनकोड-४००००८

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १० डिसेंबर २०१९  सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवणे  आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.