आसाम राइफल्स मध्ये टेक्निशिअन/ ट्रेड्समन पदाच्या ७४९ जागा

भारतीय संरक्षण दलाच्या आसाम राइफल्स मध्ये टेक्निशिअन आणि ट्रेड्समन पदाच्या एकूण ७४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

टेक्निशिअन आणि ट्रेड्समन पदाच्या एकूण ७४९ जागा
हिंदी ट्रांसलेटर, नर्सिंग असिस्टंट, बिल्डिंग & रोड, ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन, स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, लिपिक, लॅब असिस्टंट, पर्सनल असिस्टंट, फार्मासिस्ट, इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल, एक्स-रे टेक्निशिअन, लाइनमन फील्ड, वेटनरी फिल्ड असिस्टंट, रेडिओ मॅकेनिक, महिला अटेंडंट/ आया, आर्मोरर, महिला सफाई, वाहन मॅकेनिक, कुक (पुरुष), इलेक्ट्रिशिअन वाहन मॅकेनिक, पुरुष सफाई, इंजिनिअर आर्टिफिशर, वॉशरमन, सर्व्हेयर, न्हावी (पुरुष), युफोल्स्टर, उपकरणे & बूट रिपेयर, इलेक्ट्रिशिअन, टेलर, ब्लॅकस्मिथ, कारपेंटर आणि प्लंबर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रता आवशयक आहे. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.)

वयोमर्यादा – १ जानेवारी २०१९ रोजी उमेदवाराचे वय पदांनुसार १८ ते २३ वर्ष, १८ ते २५ वर्ष, २० ते २५ वर्ष, २१ ते २३ वर्ष, २२ ते २८ वर्ष, २० ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा शुल्क – ग्रुप- बी करिता २००/- रुपये आणि ग्रुप- सी करिता १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

भरती मेळाव्याची तारीख – २८ जानेवारी २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.