भंडारा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ९३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत  असून काही पदांकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे .

विविध पदांच्या एकूण ९३ जागा
 सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTCP), वैद्यकीय अधिकारी आयुष (UG), स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट (NPPcD), श्रवण-अशक्त मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), कार्यक्रम सहाय्यक (एनपीपीसीडी) आकडेवारी), लॅब तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, पॅरा मेडिकल वर्कर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीची तारीख – सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस पदांकरिता दिनांक ६ जून २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.