सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ६४ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६४ जागा
वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समाजसेवक, पोषण अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, सुपर स्पेशॅलिस्ट आणि विशेषज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १५०/- रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.