राज्य सेवा (पूर्व) परीक्षा: अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण २०० जागा
राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील वर्ग-अ आणि वर्ग-ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०२० मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
लोकसेवा आयोग राज्य सेवा (पूर्व) परीक्षा -२०२०
सहाय्यक राज्यकर आयुक्त पदांच्या १० जागा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी पदांच्या ७ जागा, सहाय्यक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी पदाची १ जागा, उद्योग उपसंचालक (तांत्रिक) पदाची १ जागा, सहाय्यक संचालक (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता) पदांच्या २ जागा, उपशिक्षणाधिकारी (शिक्षण सेवा) पदांच्या २५ जागा, कक्ष अधिकारी पदांच्या २५ जागा, सहाय्यक गट विकास अधिकारी पदांच्या १२ जागा, सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) पदांच्या १९ जागा, उप अधीक्षक (भूमी अभिलेख) पदांच्या ६ जागा, उप अधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदाची १ जागा, सहाय्यक आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क) पदाची १ जागा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी पदांच्या ४ जागा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम पदांच्या ११ जागा आणि नायब तहसीलदार पदांच्या ७३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेची पदवी उत्तीर्ण किंवा शेवटच्या वर्षात शिकत असावा.
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय/ अनाथ उमेदवारांसाठी ३२४/- रुपये आहे.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १३ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.