गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदांच्या ९२ जागा

आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी आणि भामरागड शाळांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील शिक्षक पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या एकूण ९२ जागा
क्रीडा शिक्षक/ क्रीडा मार्गदर्शक पदांच्या ४३ जागा, कला (कार्यानुभव) शिक्षक पदांच्या ४३ जागा आणि संगणक शिक्षक/ निर्देशक पदाच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार अनुक्रमे बी.पी.एड. किंवा ए.टी.डी. (कला शिक्षक डिप्लोमा) किंवा बी.एस्सी (सीएस/ आयटी) अथवा बी.सी.ए. अथवा बी.ई., बी.टेक. अर्हता धारक असावा.

नोकरीचे ठिकाण – गडचिरोली, अहेरी आणि भामरागड (जि.गडचिरोली)

फीस – नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, एल.आय.सी. ऑफिस जवळ कॉम्प्लेक्स, गडचिरोली, पिनकोड: ४४२६०५

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – १३ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 


Comments are closed.