राज्यातील विविध शाळेतील विविध शिक्षक पदांच्या एकूण २१६७८ जागा

राज्यातील विविध जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद शाळांमधील शिक्षक पदांच्या एकूण २१६७८ जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जाहिरात पवित्र पोर्टल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदरील भरती प्रक्रिया अंतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या शाळेतील १२ हजार ५२२ जागा, १८ महापालिकांच्या शाळेतील २ हजार ९५१ जागा, नगरपालिका/ नगर परिषद अंतर्गत शाळेतील १ हजार ६०० जागा आणि खासगी अनुदानित शाळेतील ५ हजार ७२८ जागा मुलाखती/ मुलाखतीशिवाय भरण्यात येणार असून उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम फेब्रुवारी २०२४ रोजी निश्चित करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना

मुलाखती शिवाय भरती जाहिराती

मुलाखतीद्वारे भरती जाहिराती

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.