राज्य वीज वितरण कंपनी मध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या ५३४७ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण ५३४७ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विद्युत सहाय्यक पदांच्या ५३४७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी/ तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) व्यवसाय  पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCVT) यांनी विजतंत्री/ तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिक सेक्टर) प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २९ डिसेंबर २०२३ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ई. डब्ल्यू. एस.)/ खेळाडू/ अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष सवलत आहे.)

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये तसेच मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ई. डब्ल्यू. एस.)/ खेळाडू/ अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२५/- रुपये  (जीएसटी वेगळी)  फीस आकारली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट


सौजन्य: लिमरा नेट कॅफे, कडा.


 

Comments are closed.