वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांच्या १३७ जागा

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (DMER) यांच्या अधिनस्त असलेल्या श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील गट-ड सवांर्गातील विविध पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३७ जागा
श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणी गृह परिचर, दप्तरी, परिचर आणि सफाईगार पदाच्या जागा

सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील शिंपी, दंत परिचर, उदवाहन चालक, वस्तीगृह सेवक/ मेस सेवक, कक्षसेवक, रुग्णपट वाहक, न्हावी, धोबी, शिपाई, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, माळी, कक्षसेवक/ कक्ष आया/ महिला आया/ बाह्यरुग्ण विभाग सेवक, सुरक्षारक्षक/ पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक, क्ष-किरण सेवक आणि सफाईगार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.