इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOCL) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५७४ जागा

भारत सरकारच्या अधिपत्याखालील स्वायत्त कंपनी असलेल्या इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) पदाच्या ४०७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ३ वर्षाची बी.एस्सी.(भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र/ औद्योगिक
रसायनशास्त्र) अर्हता धारक असावा.

फिटर (यांत्रिक) पदाच्या १५४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह २ वर्षाचा आयटीआय (फिटर) ट्रेड उत्तीर्ण असावा.

बॉयलर (यांत्रिक) पदाच्या ८८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ३ वर्षाची बी.एस्सी.(भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र/ औद्योगिक
रसायनशास्त्र) अर्हता धारक असावा.

प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (रासायनिक) पदाच्या २७१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ३ वर्षाची रासायनिक अभियांत्रिकी/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मध्ये पदविका धारक असावा.

प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (यांत्रिक) पदाच्या १६४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ३ वर्षाची यांत्रिकी अभियांत्रिकी मध्ये पदविका धारक असावा.

प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (विद्युत) पदाच्या २१५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ३ वर्षाची विद्युत अभियांत्रिकी मध्ये पदविका धारक असावा.


प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (उपकरणे) पदाच्या ९६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ३ वर्षाची इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स/ उपकरणे आणि नियंत्रण अभियांत्रिकी पदविका धारक असावा.

सचिवालय सहाय्यक पदाच्या ७५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ए. किंवा बी.एस्सी. किंवा बी.कॉम. पदवीधारक असावा.

लेखापाल पदाच्या २६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक (बी.कॉम.) अर्हता धारक असावा.

डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर) पदाच्या ४२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता बारावी उत्तीर्ण असावा.

डेटा एंट्री ऑपरेटर (कौशल्य) पदाच्या ३६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता बारावी उत्तीर्णसह डेटा एन्ट्री ऑपरेटर कौशल्य प्रमाणपत्र धारक असावा.


वयोमर्यादा – दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी १८ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – नाही.

परीक्षा – दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ रोजी लेखी लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter