हिंदुस्थान इन्सेक्टिसाइड्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
अभियंता, भाषा अधिकारी (हिंदी) आणि अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३२ वर्ष दरम्यान असावे.  (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३५ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३७ वर्षापेक्षा जास्त नसावे.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवारागासाठी परीक्षा फीस ५९०/- रुपये आहे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १६,४००/- रुपये – ४०,५००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता -अभियंता, हिंदी अधिकारी, अधिकारी (लेखा) पदाकरिता ‘उपमहाव्यवस्थापक (एचआर अँड ए), एचआयएल (इंडिया) लिमिटेड, रसायनी, जिल्हा. रायगड, पिनकोड-४१०२०७ (महाराष्ट्र) आणि अधिकारी (व्यावसायिक) पदाकरिता जनरल मॅनेजर (एचआर अँड अडमिन.), एचआयएल (इंडिया) लिमिटेड, एससीओईपी कॉम्प्लेक्स, कोर -६, दुसरा मजला, ७, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड -११०००३ येथे अर्ज करावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.