अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानात नर्सिंग अधिकारी पदांच्या ३८०३ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान यांच्या देशातील विविध राज्यातील विविध आस्थापनेवरील नर्सिंग अधिकारी (ऑफिसर) पदांच्या एकूण ३८०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नर्सिंग अधिकारी पदांच्या ३८०३ जागा
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नवी दिल्ली मध्ये ५९७ जागा, भुवनेश्वर मध्ये ६०० जागा, देवगड मध्ये १५० जागा, गोरखपूर मध्ये १०० जागा, जोधपूर मध्ये १७६ जागा, कल्याणी मध्ये ६०० जागा, मंगलागिरी मध्ये १४० जागा, नागपूर मध्ये १०० जागा, पटना मध्ये २०० जागा, रायबरेली मध्ये ५९४ जागा, रायपूर मध्ये २४६ जागा आणि ऋषिकेश मध्ये ३०० जागा असे एकूण ३८०३ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवाराने बी.एससी. (ऑनर्स) नर्सिंग/ बी.एससी. (नर्सिंग) किंवा जीएनएम पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष ते कमाल ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

फीस – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२००/- रुपये आणि सर्वसाधारण/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी  १५०० /- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑगस्ट २०२० पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.