राज्यातील पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रयत्न

राज्यात पोलीस शिपाई पदासाठी मोठी भरती होणार असून तब्बल १२ हजार ५२८ पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र मराठा आरक्षणाला स्थगिती आल्याच्या पार्श्वभूमीवर लगेच पोलीस भरती करण्याचा निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली असून “तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का?” असा सवाल विचारत मराठा आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत पोलीस भरती घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोबतच भाजप आमदार नितेश राणे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनीही पोलीस भरती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});