केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदांच्या २४१ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २४१ जागा
प्रादेशिक संचालक, वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, व्यवस्थापक श्रेणी-१/विभाग अधिकारी, वरिष्ठ डिझाइन अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, शास्त्रज्ञ ब, कायदेशीर अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, डायलिसिस वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ श्रेणी तिसरा सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, शास्त्रज्ञ ब, सहाय्यक संचालक, उपसंचालक, सहाय्यक विधान सल्लागार, उपविधान सल्लागार, सहाय्यक शिपिंग मास्टर आणि सहाय्यक संचालक, नॉटिकल सर्व्हेअर-सह-उपसंचालक, सहाय्यक पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक, विशेषज्ञ श्रेणी II, कार्यकारी अभियंता, सहाय्यक जिल्हा वकील पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!