केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत विविध पदांच्या एकूण ८८ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत विविध पदांच्या एकूण ८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८८ जागा
वनस्पतिशास्त्रज्ञ, कायदेशीर अधिकारी (श्रेणी -२), सह सहाय्यक संचालक, विशेषज्ञ (ग्रेड-III) आणि इतर रिक्त पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने वनस्पतिशास्त्र/ फलोत्पादन/ जीवन विज्ञान/ कृषी मध्ये पदव्युत्तर पदवीसह ३ वर्षे अनुभव किंवा आंतरराष्ट्रीय कायदा/ आंतरराष्ट्रीय संबंध/ आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या क्षेत्रात विशेषीकरणासह विधी पदव्युत्तर पदवीसह ५ वर्ष अनुभव किंवा बी.टेक./बी.ई./बी.एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)/ पदव्युत्तर पदवी
किंवा एम.बी.बी.एस.अथवा संबंधित विशिष्ट प्रकारात पदव्युत्तर पदवीसह ३ वर्षे अनुभव धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी ३० वर्ष किंवा ४० वर्ष किंवा ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस -खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.