पोलीस भरतीकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ आज संपणार

राज्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या आणि अर्ज भरू शकलेल्या उमेदवारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली १५ दिवसांची मुदतवाढ आज दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी संपत आहे.

राज्यात सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीसाठी आतापर्यंत ११ लाख ८० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करताना अनेक अडचणी येत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या तांत्रिक/ नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र/ भूकंपग्रस्त बद्दलच्या अडचणी दूर करण्यात आल्या असून त्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करून सर्व उमेदवारांना प्रस्तुत भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे, याकरिता आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असून ऑनलाईन अर्ज पद्धतीने करण्यास देण्यात आलेली मुदतवाढ आज दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी संपत आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सर्व जाहिराती पाहा येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा
मुदतवाढ घोषणापत्र पाहा येथे क्लिक करा
नॉन-क्रिमीलेअर सूचना येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनल जॉईन करा येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.