पुण्यातील कंपन्यांचे पर्मनंट कामगार आर्थिक मंदीच्या नावाखाली घरी

पुण्यातील नामांकित कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीजच्या टेक्नोवेल्ड या उपकंपनीने आर्थिक मंदीच्या नावाखाली 53 पर्मनंट कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबियांनी गेल्या 13 दिवसांपासून भारत फोर्ज कंपनीच्या गेटबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. पण तरीही कल्याणी उद्योगसमुह या पीडित कामगारांची साधी दखलही घेत नाहीये. या पर्मनंट कामगारांची फक्त कपंन्यांचे नावं बदलून फसवणूक करण्यात आली आहे.
पुण्यातील नामांकित कल्याणी ग्रुपची भारत फोर्ज कंपनी. याच कंपनीच्या वेल्डिंग वर्कशॉपमध्ये गेली पंधरा वर्षे काम करणाऱ्या 53 कामगारांना मंदीच्या नावाखाली तडकाफडकी काढून टाकण्यात आलंय. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या या कामगारांनी आपल्या बायकामुलांसोबत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलंय. गेल्या 13 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे पण कंपनीने त्यांची साधी दखलही घेतलेली नाही. त्यामुळे हे कामगार पुरते हवालदील बनलेत.

Comments are closed.