मुंबई महापालिकेत नोकर भरती बंद, शिकाऊ कंत्राटी भरती करणार

महानगरपालिका मध्ये यापुढे नोकर भरती होणार नाही, असे स्पष्ट संकेत अर्थसंकल्प वर्ष 2020-21 मध्ये देण्यात आले असून महापालिकेत सध्या 103000 कर्मचारी काम करत असून तर सुमारे 40 हजार जागा रिक्त आहेत. या जागा महापालिकेने 2005 सहापासून भरणे बंद केले आहे.

मुळातच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत असताना पालिकेचा खर्च कमी करण्यासाठी आयुक्तांनी नवी शक्कल लढवली आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवी भरती न करता गरज भासल्यास केवळ सहा महिने किंवा वर्षभर यासाठी शिकाऊ उमेदवार घेण्याचे ठरवले असून त्यामुळे पालिकेचा आर्थिक बोजा कमी होईल, असे आयुक्तांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा

 


Comments are closed.