पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध कंत्राटी पदांच्या ३७ जागा

पनवेल महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत (NUHM) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध पदाच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस. पदवी धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ पेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

स्टाफ नर्स (GNM) पदाच्या एकूण २१ जागा
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्णसह जी.एन.एम. कोर्स केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ पेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटंट पदाच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.कॉम/ एम.कॉम सह टॅली, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. आणि २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ पेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – पनवेल

मुलाखतीची तारीख/ वेळ – वैद्यकीय अधिकारी पदांसाठी २२ ऑक्टोबर २०१८ रोजी (सकाळी ९ वाजता), स्टाफ नर्स पदांसाठी २३ ऑक्टोबर २०१८ रोजी (सकाळी ९ वाजता) आणि डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटंट पदांसाठी २५ ऑक्टोबर २०१८ (सकाळी ९ वाजता) घेण्यात येतील.

मुलाखतीचे ठिकाण – क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल जि. रायगड.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

संबंधित वेबसाईट लिंक

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});