राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक तथा वाहक पदाच्या ३६०६ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा विभागाच्या आस्थापनेवरील चालक तथा वाहक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

चालक तथा वाहक पदाच्या एकूण ३६०६ जागा
अहमदनगर विभाग ५६ जागा, सातारा विभाग ५१४ जागा, सांगली विभाग ७६१ जागा, कोल्हापूर विभाग ३८३ जागा, नागपूर विभाग ८६५ जागा, चंद्रपूर विभाग १७० जागा, भंडारा विभाग ४०७ जागा, गडचिरोली विभाग १८२ जागा आणि वर्धा विभाग २६८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) यांचेकडील अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना व पी.एस.व्ही.बॅज (बिल्ला) असणे आवश्यक असून वाचकाचा वैध परवाना व बॅज (बिल्ला) नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील. तसेच सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरील (ट्रक, प्रवासी बस) चालविण्याचा किमान ३ वर्ष विना अपघात अनुभव असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता – उमेदवाराची उंची किमान १६० सेंमी व कमाल १८० सेंमी असणे आवश्यक असून दृष्टी चष्म्याविना ६ x ६ (चष्मा न लावता पाहता येणे) आवश्यक आहे. तसेच रंगआंधळेपणा/ रातआंधळेपणा हा दोष असलेले उमेदवार अपात्र असतील.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ जानेवारी २०१९ रोजी २४ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

आरक्षण – शासन परिपत्रकानुसार महिलांना ३० टक्के, माजी सैनिकांना १५ टक्के, भूकंपग्रस्त २ टक्के, प्रकल्पग्रस्त ५ टक्के, खेळाडू ५ टक्के, अंशकालीन कर्मचारी १० टक्के आणि अनाथ मुलांकरिता १ टक्का आरक्षण देय राहील. तसेच केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या १० टक्के आरक्षणा संदर्भात राज्य शासन जे आदेश निर्गमित करील ते प्रस्तुत प्रकरणी लागू राहील.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये तसेच मागास प्रवर्गातील उमेदवार आणि महाराष्ट्रातील दुष्काळ ग्रस्त भागातील उमेदवारांना ३००/- रुपये (बँक चार्जेस शिवाय) आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०१९ (रात्री ११:५९ पर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});