लोकसेवा आयोगामार्फत गट-क संवर्गातील पदांच्या एकूण २३४ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील पदांच्या एकूण २३४ जागा भरण्यासाठी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०१९ रविवार, दिनांक १६ जून २०१९ रोजी आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
गट-क संवर्गातील पदांच्या २३४ जागा
दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदाच्या ३३ जागा, कर सहाय्यक (वित्त विभाग) पदाच्या १२६ जागा, लिपिक-टंकलेखक (सामान्य प्रशासन) पदाच्या ७५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ५ वर्ष आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७ वर्ष सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मे २०१९ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.