अमरावती आदिवासी विकास विभागात ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ८५ जागा

अमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी केवळ अमरावती, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामधील केवळ अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातील पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) पदाच्या ६७ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बी.ए.(इंग्रजी) आणि बी.एड. किंवा बी.एस्सी.बी.एड अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

उच्च माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण १८ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बी.एड. किंवा एम.एस्सी.बी.एड. अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्ष दरम्यान असावे. (अपंग/ माजी सैनिक/ प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी २ वर्ष सवलत आणि खेळाडू/ शासकीय आश्रमशाळेत किमान पाच वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – अमरावती, यवतमाळ आणि नांदेड जिल्हा

परीक्षा फीस – सर्वच प्रवर्गातील उमेदवारांना ७००/- रुपये आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०१९ आहे.

अधिक महिला कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});