बीड जिल्ह्यात मानसेवी होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण १८८ जागा
बीड जिल्हा होमगार्ड पथक/ उपपथक निहाय अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील बीड, माजलगाव, आष्टी, पाटोदा, केज, गेवराई आणि अंबाजोगाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानसेवी होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण १८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांची प्रत्यक्ष नोंदणी आयोजित करण्यात येत आहे.
मानसेवी होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या १८८ जागा
बीड पथक ५३ जागा, माजलगाव पथक १ जागा, आष्टी पथक ३६ जागा, पाटोदा पथक ६ जागा, केज पथक ४९ जागा, गेवराई पथक ११ जागा आणि अंबाजोगाई पथक ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कमीत-कमी दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
शाररिक पात्रता – पुरुष उमेदवाराची उंची किमान १६२ सेंमी असावी, छाती किमान ७६ सेंमी (फुगवून ८१ सेंमी) असावी, १६०० मीटर धावणे आणि ७.२६० किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक असून महिला उमेदवारांसाठी उंची १५० सेंमी, ८०० मीटर धावणे आणि ४ किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ते ५० वर्ष दरम्यान असावे. (उमेदाराचा जन्म २६ मार्च १९६९ ते २५ मार्च १९९९ दरम्यान झालेला असावा.
नोकरीचे ठिकाण – बीड जिल्ह्यातील संबंधित ठिकाण.
नोंदणीचे स्थळ – कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, नगर रोड, बीड.
नोंदणी तारीख/ वेळ – २६ व २७ मार्च २०१९ रोजी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.