लोकसेवा आयोग मार्फत महसूल व वन विभागात विविध पदाच्या १०० जागा

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अखत्यारीतील सहाय्यक वन संरक्षक आणि वन क्षेत्रपाल पदाच्या जागा भरण्यासाठी लोकसेवा आयोगाकडून रविवार दिनांक २६ मे २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा- २०१९ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र वनसेवा (पूर्व) परीक्षा- २०१९ परीक्षा
सहाय्यक वन संरक्षक (गट-अ) पदाच्या २९ जागा आणि वनक्षेत्रपाल (गट-ब) पदाच्या २९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषि/ इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी २१ ते ३८ आणि १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २७४/- रुपये आहे.

परीक्षा – २६ मे २०१९ रोजी घेण्यात येईल.

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, मुंबई, पुणे आणि नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.