राज्य कर्मचारी विमा महामंडळात सुरक्षा अधिकारी पदांच्या ५३९ जागा
राज्य कर्मचारी विमा महामंडळ, नवी दिल्ली (ईएसआयसी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक (गट-ब)/ अधीक्षक पदाच्या ५३९ जागा
शैक्षणिक पात्रता – कुठल्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक. (वाणिज्य / कायदा / व्यवस्थापन पदवीधारकांना प्राधान्य दिले जाईल) आणि संगणक वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच सरकारी संस्था किंवा महामंडळ किंवा शासकीय उपक्रम किंवा स्थानिक संस्था किंवा शेड्यूल्ड बॅंक यांच्या आस्थापनेवरील तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५ आक्टोबर २०१८ रोजी २१ ते २७ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
परीक्षा फीस – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक/ कार्यालयीन कर्मचारी असणाऱ्या उमेदवारांसाठी २५०/- रुपये आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ आक्टोबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.