राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४९५ जागा

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक ‘ब’ पदांच्या 288 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बी.टेक./ एम.एस्सी./ एम.ई./ एम.टेक./एम.फील. (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, संप्रेषण, कॉम्पुटर & नेटवर्किंग सुरक्षा, कॉम्पुटर एप्लीकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, आयटी, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन, माहिती, संगणक व्यवस्थापन, सायबर कायदा, इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) अर्हता धारक असावा.

वैज्ञानिक/ तांत्रिक सहाय्यक पदांच्या २०७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमदेवार एम.एस्सी./ एम.एस./ एम.सी.ए./ बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, कॉम्पुटर & नेटवर्किंग सुरक्षा, सॉफ्टवेअर सिस्टम, आयटी, माहितीशास्त्र) अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक 26 मार्च 2020 रोजी 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे.  (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत 5 वर्ष आणि  इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनिश्चित जमाती/ दिव्यांग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 26 मार्च 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

छोट्या जाहिराती पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.