नागपूरच्या मॉयल लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६८ जागा
नागपूर येथील मॉयल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून कार्यकारी संचालक पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत व कार्यकारी पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत तसेच व्यवस्थापक/ वरिष्ठ व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा) पदांच्या थेट मुलाखतीआयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६८ जागा
कार्यकारी संचालक (कार्मिक), वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा), जीटी (यांत्रिक), जीटी (इलेक्ट्रिकल), व्यवस्थापक (सर्वेक्षण), माईन फोरमॅन/ ट्रेनी माईन फोरमॅन, माईन फोरमॅन, सुपरवायझर/ ट्रेनी सुपरवायझर (इलेक्ट्रिकल), माइन मेट, ब्लास्टर, सीएसआर- कार्यकारी अधिकारी (एमओआयएल फाउंडेशनसाठी निश्चित मुदत), व्यवस्थापक/ वरिष्ठ व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय १५ सप्टेंबर २०२१ रोजी ३० वर्षावेक्षा जास्त नसावे. (इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारासांठी ५ वर्ष तर दिव्यांग उमेदवारांसाठी १० वर्ष सवलत.)
फीस – परीक्षा शुल्क १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ व १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.
मुलाखतीची तारीख – दिनांक २७ व २८ सप्टेंबर २०२१ रोजी पदांनुसार मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यालय, मॉयल (MOIL) लिमिटेड, मॉयल भवन, 1-A, काटोल रोड, नागपूर, पिनकोड- ४४००१३
# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.