महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० फॉर्म्युला अखेर सरकारने रद्द केला

मराठवाडा व विदर्भातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर गेल्या दोन तपापेक्षा अधिक काळापासून वैद्यकीय प्रवेशात ७०/३० च्या अटीमुळे अन्याय होत असल्याने मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधींनी हा विषय सरकार दरबारी लावून धरल्याने अखेर महाविकास आघाडी सरकारने मंगळवारी विधान परिषदेत याविषयीची जाचक अट असलेला ७०/३० फार्म्युला रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे व ४ सप्टेंबरपासून तशी अधिसूचना काढली असून वैद्यकीय प्रवेशात या वर्षीपासूनच राज्यभर समान सूत्र (एक राज्य- एक गुणवत्ता) लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

संपूर्ण बातमी वाचा

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});