दिल्ली उच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायिक साहायक पदांच्या एकूण १३२ जागा

दिल्ली उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ न्यायिक सहाय्यक पदांच्या एकूण १३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर आणि  संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि. वाणिज्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १९ फेब्रुवारी २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.