अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७५ जागा
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७५ जागा
बँकिंग ऑफिसर (ग्रेड-I, ग्रेड-II) व कनिष्ठ लिपिक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा व उर्वरित पदांकरिता उमेदवाराने एम.ए./ एम. कॉम/ एम. एससी/ एमटेक (कृषी) अर्हता ५०% गुणासह उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवाराचे वय २० ते २८ वर्ष दरम्यान असावे आणि ग्रेड I पदाकरिता उमेदवाराचे वय ३५ ते ४२ तसेच ग्रेड II पदाकरिता उमेदवाराचे वय २८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फीस – परीक्षा फीस १०००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पर्यंत अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.