भोपाळ येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या ७४ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भोपाळ (मध्यप्रदेश) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 7४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

कनिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या ३५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस. आणि एम.डी./ एम.एस./डी.एन.बी. अर्हता धारक असावा.

शिक्षक/ निदर्शक पदांच्या ४९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस. अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १२ फेब्रुवारी २०२० रोजी ३० वर्षापेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भोपाळ (मध्यप्रदेश)

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२००/- रुपये आहे, तर दिव्यांग उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

मुलाखतीची तारीख – कनिष्ठ निवासी अधिकारी पदांकरिता दिनांक ६ फेब्रुवारी २०२०  आणि  शिक्षक/ निदर्शक पदांकरिता 7 फेब्रुवारी 2020 रोजी मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचे ठिकाण –  मेडिकल कॉलेज, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भोपाळ (मध्यप्रदेश) येथे घेण्यात  येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.